परिश्रमाची तयारी ठेवली तर यश हमखास मिळते - डॉ. नरेंद्र काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:13+5:302021-01-24T04:16:13+5:30
बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय, मोरेवाडी येथे शिक्षक व विद्यार्थी सहविचार सभेचे व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले ...
बनेश्वर शिक्षण संस्था संचलित गुरुदेव विद्यालय, मोरेवाडी येथे शिक्षक व विद्यार्थी सहविचार सभेचे व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. काळानुरूप प्रत्येकाने आपल्यामध्ये बदल घडवून आणायला हवेत, तरच या स्पर्धेच्या युगात आपण टिकू शकू; अन्यथा स्पर्धेतून आपण बाहेर फेकले जाण्याची शक्यता जास्त असते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणमहर्षी वै. नारायण दादा काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सहशिक्षक पंडित चव्हाण यांनी केले. बनेश्वर शिक्षण संस्थेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल गुरुदेव परिवाराच्या वतीने मुख्याध्यापिका काकडे एस. एस. यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र काळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेलंग एस. जे. यांनी केले तर आभार प्रकाश बोरगावकर यांनी मानले.
याप्रसंगी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसोबतच सहशिक्षक मनेश गोरे, शेरे ना. ल., बाळासाहेब शिंदे, प्रदीप नाईकवाडे यांची उपस्थिती होती.