फरदड कापूस घेतल्यास पुन्हा बोंडअळीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:32 AM2018-12-20T00:32:08+5:302018-12-20T00:32:37+5:30
जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये बोंडअळीच्या पतंगाना पोषक वातावण असल्याने वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फरदड कापुस अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात कापसाचे ३ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. नुकत्याच झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात बी. टी. वाणाच्या कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. शेंदरी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीदेखील कृषी विभागाने पºहाटीसह उपटून काढण्याचे आवाहन तसेच सुप्त अवस्थेत अळी शेतात राहू नये या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले होते. मात्र फरदड कापूस घेण्याकडेच शेतकऱ्यांचा कल राहिल्याने नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. पहिल्या वेचणीतच कापसाचा झाडा होऊन उतारा केवळ २५ ते ३० टक्केच मिळाला. डिसेंबरमध्ये वातावरण बोंडअळीसाठी अनुकूल असते. कपाशीच्या पºहाटया किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक बनते. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.