कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:47+5:302021-05-19T04:34:47+5:30

सध्या प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे लसीकरण करून घेणे हाच एकमेव आणि मृत्युदर कमी करू शकणारा उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ...

If you want to block the third wave of corona, speed up vaccination | कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवा

कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवा

Next

सध्या प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे लसीकरण करून घेणे हाच एकमेव आणि मृत्युदर कमी करू शकणारा उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लस उपलब्ध करून जास्तीत जास्त लोकांना ती कशी देता येईल, यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना डॉ. राजेश इंगोले यांनी प्रशासनाला केली आहे.

पहिल्या लाटेनंतरची चूक जर सरकार, प्रशासन याही वेळेस दुरुस्त करणार नसेल, गेल्या चुकीपासून शिकणार नसेल, तर मग जनता कोणाच्या भरवशावर जगणार आहे, असा सवालही डॉ. इंगोले यांनी केला आहे. लोकांनीही या महामारीत आपली जबाबदारी ओळखून कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना, प्रतिबंधात्मक उपाय, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे या गोष्टी पाळाव्यात, असे आवाहनही डॉ. इंगोले यांनी केले आहे.

Web Title: If you want to block the third wave of corona, speed up vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.