विमा पाहिजे असेल, तर ७२ तासात द्या माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:12+5:302021-09-02T05:11:12+5:30

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच ...

If you want insurance, provide information within 72 hours | विमा पाहिजे असेल, तर ७२ तासात द्या माहिती

विमा पाहिजे असेल, तर ७२ तासात द्या माहिती

Next

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतजमीनच वाहून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत. पिकांच्या नुकसानीचे फोटो व माहिती ॲपच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या ॲपवर पाठवायची आहे. तसेच ऑफलाईन तक्रार देखील करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ७२ तासात करणे अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे देखील नुकसान अनेक भागात झाले आहे. पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन फोटोसह नुकसानीची तक्रार ॲपच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. तसेच ही तक्रार ऑफलाईन देखील करता येणार आहे. याचा कालावधी हा ७२ तास असणार आहे, तर, यासंदर्भातील पीक विमा कंपनीकडून फार्मर ॲप ‘गूगलप्ले’वरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन केले आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून तक्रारी केल्या नसल्यामुळे नुकसान होऊन देखील विमा रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे शासनाच्या पंचनाम्यावर अवलंबून राहू नका, असे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

शासनाचा पंचनामा गृहित धरून लाभ द्यावा

कृषी विभाग व विमा कंपनीकडून ऑनलाईन तक्रार करण्याची युक्ती जुलमी आहे. अनेकांकडे मोबाईल नाहीत. असला तर जास्त समजत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जे नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत, त्यावरून पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. कंपनी काय शेतकऱ्यांना भीक देत नाही. आम्ही आधी पैसे भरतो, मग नुकसान झाल्यावर भरपाई मागतो. प्रशासनाचे पंचनामे गृहित धरून नुकसान भरपाई दिली नाही, तर, पीक विमा कंपनीविरुद्ध न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली.

--

शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करावी किंवा टोल फ्री क्र- १८००-४१९-५००४ तसेच लिखित स्वरूपात बॅंकेत व तालुका कृषी अधिकाऱ्याकडे नुकसान झाल्याची तक्रार करता येणार आहे. त्यानुसार विम्याचा लाभ मिळणार आहे.

- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

Web Title: If you want insurance, provide information within 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.