माजी सैनिकांच्या रुग्णालयाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:46 AM2018-03-06T00:46:25+5:302018-03-06T00:46:30+5:30
देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांसाठी शहरात केंद्र सरकारकडून इ.सी.एच.एस पॉलिक्लिनिक रूग्णालय उभारले आहे. मात्र या रूग्णालयात पाणी आणि तेथे जाण्यासाठी रस्ता अशा सुविधाच नाहीत. याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. सैनिकांविषयी पालिकेला सहानुभतीच नाही, असा आरोप सर्वसामान्यांमधून केला जता आहे.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांसाठी शहरात केंद्र सरकारकडून इ.सी.एच.एस पॉलिक्लिनिक रूग्णालय उभारले आहे. मात्र या रूग्णालयात पाणी आणि तेथे जाण्यासाठी रस्ता अशा सुविधाच नाहीत. याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. सैनिकांविषयी पालिकेला सहानुभतीच नाही, असा आरोप सर्वसामान्यांमधून केला जता आहे.
जिल्ह्यातील १२०० माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र शासनाकडून मोफत ई.सी.एस.एस पॉलिक्लिनिकची व्यवस्था करण्यात आली. शहरातील धानोरा रोड परिसरात बांधकाम विभागाच्या एका ईमारतीत हे रूग्णालय असून २१ जून २०१२ साली त्याची सुरूवात झाली होती. सहा वर्ष पूर्ण होऊनही अद्याप या रूग्णालयाला पालिकेकडून मुबलक सुविधा पुरविल्या नाहीत. रूग्णालयाकडे जाण्यासाठी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी केवळ पाईपलाईन आहे, मात्र पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णालय प्रशासनाला टँकरद्वारे पाणी खरेदी करण्याची वेळ आली आहे. ड्रेनेजची सुविधाही नसल्यामुळे रूग्णालयात व परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
महिन्याला १४०० रूग्णांवर मोफत उपचार
विविध गंभीर व किरकोळ आजार जडलेले रूग्ण येथे दररोज मोफत उपचारासाठी येतात. महिन्याला जवळपास १४०० रूग्णांवर उपचार केले जातात. २४ तास रूग्णालयात उपचाराची सुविधा आहे. एखाद्या आजारावर सुविधा उपलब्ध नसेल तर इतर रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली जाते. सदरील सर्व खर्च ई.सी.एच.एस पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे हृदयरोग, हाडांचे आजारावरील महागड्या शस्त्रक्रिया या माध्यमातून केल्या जातात. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वा गंभीर आजाराच्या रुग्णांना इतरत्र रेफर केले जाते.
येथे एक दंतचिकित्सक व दोन जनरल फिजिशियन आहेत.
सुविधा नसल्याने त्रास
रूग्णालय सुविधांसाठी पालिका व बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. रस्ता, ड्रेनेजची सुविधा नसल्याने त्रास होत आहे. इमारतीची डागडुजी, रंगरंगोटीसाठी सहकार्य करावे.
-कर्नल डॉ.अश्विन शर्मा
व्यवस्थापक, ई.सी.एच.एस पॉलिक्लिनिक, बीड