ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:31 AM2021-02-14T04:31:17+5:302021-02-14T04:31:17+5:30
गुटखा विक्री तेजीत; संबंधितांचे दुर्लक्ष पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रास गुटख्याची विक्री होताना दिसून येत ...
गुटखा विक्री तेजीत; संबंधितांचे दुर्लक्ष
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील टपऱ्या, दुकानांवर सर्रास गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने येथे कारवाई करणे गरजेचे आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरासह तालुक्यात कारवाई झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.
दुभाजकाजवळ स्वच्छतेची मागणी
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत; परंतु या दुभाजकाशेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.
वाहनचालकांकडून नियमांची अवहेलना
केज : शहर व परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. शहरात तर मुख्य रस्त्यावर अनेक रिक्षांची बिनधास्त पार्किंग असते. मोकळ्या जागेत पार्किंग न करता सर्रास रस्त्यावर वाहने लावली जातात.
दुकानांसमोरील अंतरांचे चौकोन पुसले
अंबाजोगाई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर कमी राखले जावे. यासाठी दुकानांसमोर डिस्टन्स ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी चौकोन आखले होते. सामाजिक अंतर ठेवून ग्राहक या चौकाेनात उभे राहत होते. यामुळे गर्दी कमी होत होती व सामाजिक अंतराची अंमलबजावणी होत होती; मात्र आता दुकानांसमोरील अंतराचे चौकोन पुसले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा दुकानांसमोर गर्दी वाढू लागली आहे.