अवैध प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:34 AM2021-02-11T04:34:58+5:302021-02-11T04:34:58+5:30
चोऱ्यांत वाढ सिरसाळा : शहरात गेल्या आठवड्यापासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...
चोऱ्यांत वाढ
सिरसाळा : शहरात गेल्या आठवड्यापासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
बाजारतळाची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील आठवडे बाजार भरणाऱ्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांना तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक दिवसांपासून बाजारतळाची दुरुस्ती करून सुस्थितीत करण्याची मागणी होत आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
दुचाकी चोर सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे.