अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:03+5:302021-03-29T04:20:03+5:30
डास प्रादुर्भाव वाढला परळी : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत ...
डास प्रादुर्भाव वाढला
परळी : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत आहे. डासप्रतिबंधक फवारणीची मागणी केली जात आहे.
धुळीने आरोग्य धोक्यात
परळी : शहरात सर्वत्र रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करावा व रस्ते स्वच्छ ठेवावेत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे.
सुरळीत वीज मिळेना
बीड : तालुक्यातील नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
हिंगणी-नांदूर रस्ता खराब
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरूस्त करण्याची मागणी आहे. परंतु अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.