अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा बीड जिल्ह्यात धुडगूस सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:14 AM2018-08-28T01:14:36+5:302018-08-28T01:15:13+5:30
बीड जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव संपुष्टात येऊन वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. काही ठरावीक घाटांवरुनच वाळू उपसा सुरु आहे. मात्र, बंद असणाºया घाटांवरुन, संबंधित पोलीस व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव संपुष्टात येऊन वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. काही ठरावीक घाटांवरुनच वाळू उपसा सुरु आहे. मात्र, बंद असणाºया घाटांवरुन, संबंधित पोलीस व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
गोदावरी नदीपात्रातून होणारा वाळू लिलाव हा यावर्षी जालना जिल्ह्याकडे आहे. नदीला पाणी आल्याने काही घाटावरुन वाळू उपसा बंद करण्याचे आदेश आहेत. तरी देखील चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा सुरुच आहे. माजलगाव तालुक्यातली गोदावरी नदी पट्टा, तसेच बीड तालुक्यातील खुंडरस, चव्हाणवाडी, कुक्कडगाव येथून प्रमाणापेक्षा अधिक वाळूचा उपसा सुरु आहे.
बीड तालुक्यातील रंजेगाव व नाथापूर या वाळू घाटांवर प्रशासनाने जमावबंदी १४४ कलम लागू केला. मात्र, त्यानंतर या घाटांवर वाळूमाफियांची वक्रदृष्टी पडली. या दोन्ही घाटांवरून हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरु आहे. वाळू वाहतुकीमुळे या परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिकांना वाहतूक करणे मुश्किल झाले आहे. नागरिकांनी तक्रार करुन देखील कारवाई केली जात नाही.
पोलीस, महसूली अधिकाºयांना ‘टीप’ ?
काही महिन्यांपूर्वी गेवराई तालुक्यात तलाठ्याला वाळू माफियांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तू हप्ते घेत नाहीस का ? असे अधिकाºयाला मारहाण करणारा व्यक्ती विचारत आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार महसूल, पोलीस प्रशासनातील काही अधिकाºयांच्या अर्थपूर्ण वरदहस्तामुळेच अवैध वाळू उपसा होत आहे. बीड तालुक्यातील रंजेगांवच्या घाटावरुन वाळू उपसा करण्यासाठी पिंपळनेर पोलिसांकडून हजारो रुपये घेतल्याची चर्चा आहे. माजलगांव तालुक्यातील राजेगांव परिसरात प्रशासन व महसूल विभागाकडून कडक कारवाई करूनही वाळूचोरी रोखण्यात अपयश येत आहे.
‘तो’ अधिकारी कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अवैधरित्या वाळू उपसा करणाºयांवर, पोलीस प्रशासनातील एका बड्या अधिकाºयाचा वरदहस्त आहे. ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झालेल्या वाळू माफियांची अवैध वाळू वाहतुकीचे वाहने बिनदिक्कत जिल्ह्यात सर्रास कुठेही वाळू घेऊन जातात. ज्यांचे जमले नाही, त्यांना मात्र वेठीस धरले जाते. पोलिसांमुळेच वाळूचे भाव बेफाम वाढले, अशी चर्चा आहे.
अवैधरित्या वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाभरात मोहीम राबवलेली आहे. महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकाºयांची पथके देखील नेमलेली आहे. आम्ही केलेल्या कारवायांमधून दंडापोटी जवळपास १५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अवैधरित्या वाळू उपसा कुठे होत असेल तर नागरिकांनी प्रशासनाला कळवावे.
- आनंद पाटील,
गौण खनिकर्म अधिकारी, बीड