अवैध वाळू वाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:35 AM2019-01-18T00:35:02+5:302019-01-18T00:36:25+5:30

तालुक्यातील राक्षसभुवन, पाथरवाला, गुंतेगाव यासह अनेक भागात गोदावरी पोखरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच गेवराई महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसह ट्रँक्टर ताब्यात घेऊन जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर ट्रक ही चकलांबा पोलीस ठाण्यात तर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.

Illegal sand transport truck, tractor seized | अवैध वाळू वाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टर पकडले

अवैध वाळू वाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टर पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूल पथकाची कारवाई : १५ लाखांचा ऐवज जप्त

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन, पाथरवाला, गुंतेगाव यासह अनेक भागात गोदावरी पोखरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच गेवराई महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसह ट्रँक्टर ताब्यात घेऊन जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर ट्रक ही चकलांबा पोलीस ठाण्यात तर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत आहे. तसेच वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर शासनाचा देखील मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जात असल्याने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार गेवराई तहसीलदारांनी पथक नियुक्त केले. दरम्यान बुधवारी रात्री उमापूरचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे, चकलांबा मंडळ अधिक अंगद काशिद, कुरु ळकर, तलाठी ससाणे, ढाकणे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली.
यामध्ये विना नंबरचा ट्रक चकलांबा तर ट्रॅक्टर पाथरवाला येथे या महसूल पथकाने पकडून कारवाई केली. असुन जवळपास पंधरा लाखाचा ऐवज जप्त केला. विशेष म्हणजे उमापुरचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांनी मंगळवारीच उमापूर मंडळ अधिकारी म्हणून पदभार घेतला होता. त्यानंतर दुसºया दिवशी त्यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पकडलेल्या दोन्ही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात अहवाल देण्यात आला असल्याची माहिती मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांनी दिली. महसूल पथकाच्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले
आहेत.

Web Title: Illegal sand transport truck, tractor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.