अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:11 AM2019-05-19T00:11:19+5:302019-05-19T00:12:05+5:30

येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

Illegal transporter's bus hits the driver-driver | अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण

अवैध वाहतूकदाराची बस वाहक-चालकास मारहाण

Next
ठळक मुद्देवाहक चालकांचे बसेस थांबवून माजलगात दीड तास आंदोलन

माजलगाव : येथील बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गेटच्या मधोमध दुचाकी आडवी लावल्याने आतमधून येणाºया बसचालकाने हॉर्न वाजविल्यानंतर अवैध वाहतूकदाराने बसच्या वाहक आणि चालकास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या रापमच्या चालक - वाहकांनी दीड तास बसेस थांबवून आंदोलन केले. परिणामी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान बसस्थानकातून जीवनापुर मार्गे सिरसाळा ही बस (क्र.एम. एच. २० बीएल ०२०३) ही बस दररोजच्या नियमानुसार प्रवाशांना घेवून निघाली असतानाच आऊट गेटमध्ये एक दुचाकी (क्र. एम. एच. ४४ एच १५७) आडवी लावलेली होती. त्यामुळे बस चालकाने हॉर्न वाजवले. म्हणून रामेश्वर कुमाजी घायाळ (रा. अशोकनगर) याने चालकाच्या बाजूने जावून चालक नवनाथ सोपान मुंडे यास शिवीगाळ करुन त्याच्या गचांडीस धरुन धक्काबुक्की केली, कपडे फाडले. यावेळी वाहक एम. पी. लगसकर हे खाली उतरुन काय झाले, अशी विचारणा करत असताना त्यांच्याही श्रीमुखात भडकावत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
हा प्रकार कळताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आगारातील सर्वच चालकांनी आपल्या गाड्या रोखल्या. बाहेरुन येणाºया गाड्या देखील मुख्य रस्त्यावरच रोखल्या. त्यामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली. अखेर आगार प्रमुख डी. बी. काळम पाटील व शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी मध्यस्थी करुन सर्व बसेस बाहेर काढून दिल्या. या मारहाण प्रकरणी नवनाथ सोपान मुंडे (चालक) याच्या फिर्यादीवरुन आरोपी रामेश्वर कुमाजी घायाळ याच्याविरुद्ध शिवीगाळ व मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पी. एस. आय. रमेश जाधवर हे करीत आहेत.
जीपच्या आधी निघाली बस !
या आगारात सकाळी पासून रात्री ९ वाजेपर्यंत अवैध वाहतूक करणारी जीप, टमटम आदी वाहने उभे असतात. या अवैध वाहतुकीचा धंदा करणाऱ्यांचे अनेक वाहक - चालकांशी साटेलोटे असल्याने अवैध प्रवासी गाडी भरुन गेल्याशिवाय बस निघत नाहीत. परंतु माजलगाव -सिरसाळा गाडी वेळेत निघाल्याने व जीप न भरल्याने चिडलेल्या जीप चालकाने मारहाण केल्याची चर्चा चालक वाहकात दबक्या आवाजात करताना दिसून येत होती.
प्रवाशास मारहाण
हा गोंधळ अनेक वेळापासून सुरु असल्याने तीन चार प्रवाशांनी येवून येथे जमलेल्या वाहक चालकांना बस सोडण्याची मागणी केली. परंतु आमचे येथे काय चालले आहे असे म्हणत एका वाहकाने प्रवाशाच्या श्रीमुखात भडकवली. त्यामुळे गोंधळात भर पडली.

Web Title: Illegal transporter's bus hits the driver-driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.