मी वादळ-वाऱ्यांला घाबरणारी नाही - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:51 PM2019-10-11T23:51:50+5:302019-10-11T23:53:03+5:30
परळी : धो, धो कोसळणारा पाऊस, कडाडणाºया विजा आणि सुसाट वारा अशा निसर्गाच्या रूद्रावतारातही परळी विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार ...
परळी : धो, धो कोसळणारा पाऊस, कडाडणाºया विजा आणि सुसाट वारा अशा निसर्गाच्या रूद्रावतारातही परळी विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी अंबाजोगाई तालुक्यातील मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी रस्त्यावर थांबून अबालवृद्ध, महिला, पुरूषांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
ताई, तुमच्यामुळे मतदारसंघाला चांगले दिवस आले आहेत. आम्ही सुद्धा तुमच्यावर मतांचा पाऊस पाडणार असा शब्द मतदारांनी दिला. यावेळी पंकजा मुंडे यांनी छत्री बाजूला सारून अशा वादळ वा-याला घाबरणारी नाही. माझ्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे रक्त आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करीन. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर आणि माझ्यावर या भागाने नेहमी प्रेम केले आहे. पुढील काळात विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आशीर्वादाचे त्यांनी आवाहन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, राजाभाऊ औताडे, शामराव आपेट, गणेश कराड, महादेव फड व सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.
रोजगार देणारे उद्योग प्रकल्प आणायचे आहेत
परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव, भारज आणि लिंबगावात पंकजा मुंडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी तुमच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.
शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी विशेष योजना आणून काम करायचे आहे. कधी नव्हे एवढा विकास मी मंत्री झाल्यापासून केला आहे. गावोगावी, गल्लोगल्ली चांगले रस्ते झाले आहेत.
विकासात दळणवळणाला महत्त्व असते, त्यासाठी आपल्या भागातील सर्वच रस्ते चांगले केले आहेत. आगामी काळात युवकांच्या हाताला काम देणारे उद्योग या भागात आणायचे असून शेत मालावर प्रक्रि या करणारे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.