बीड जिल्ह्यात ११ विलगीकरण कक्षाची तातडीने उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:23 PM2020-03-20T23:23:41+5:302020-03-20T23:24:06+5:30

कोरोना प्रादुभार्वाचाअनुषगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने अकरा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Immediate erection of 4 separation rooms in Beed district | बीड जिल्ह्यात ११ विलगीकरण कक्षाची तातडीने उभारणी

बीड जिल्ह्यात ११ विलगीकरण कक्षाची तातडीने उभारणी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याचे निर्देश : संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे नागरिकांना आवाहन

बीड : कोरोना प्रादुभार्वाचाअनुषगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने अकरा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूाचा प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राहुल रेखावार, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी बीड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३३ आणि ६५ अन्वये जिल्ह्यातील खालील ठिकाणी व इमारतींमध्ये कक्ष स्थापन करण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत.
बीडमधील शासकीय आयटीआय वस्तीगृह, नगर रोड, बीड येथे २०० खाटांची व्यवस्था असलेले कक्ष निर्माण करण्यात येत आहे. त्याच बरोबर इतर तालुक्याच्या ठिकाणी ५० रुग्ण क्षमतेच्या खाटांची व्यवस्था असलेले कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. अंबाजोगाई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, केज येथे सामाजिक न्याय भवन मध्ये, वडवणी येथे कस्तुरबा गांधी शासकीय वसतीगृहामध्ये, पाटोदा येथे समाज कल्याण मुलींचे वसतीगृहात, धारूर येथे समग्र शिक्षण मुलींचे वसतीगृहामध्ये, आष्टी येथे आयटीआय कॉलेज बिल्डिंगमध्ये, शिरूर कासार येथे समाज कल्याण मुलींचे वसतीगृहात, परळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात, गेवराई येथे नगर परिषद मंगल कार्यालय मध्ये, आणि माजलगाव येथे माऊली मंगल कार्यालय मध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे.
कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक व पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पुर्वतयारी करणेत आली आहे.

Web Title: Immediate erection of 4 separation rooms in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.