गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत करा; माजलगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:36 PM2018-02-14T15:36:52+5:302018-02-14T15:37:22+5:30
माजलगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
माजलगाव ( बीड ): तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गोदावरी काठावरील गावांना गारपीटीने व अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामध्ये काळेगाव, हिवरा, डुब्बाथडी, टाकरवण, सुलतानपुर, वाघोरा, वारोळा, राजेगाव, तालखेड, मंगरुळ, गव्हाणथडी आदी गावांचा समावेश आहे. यात गहू, ज्वारी, मका, हरभरा, पपई, डाळींब, टरबुज, केळी, मोसंबी, आंबा आदी पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे शासनाने त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले, बोंडअळीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. भाजपा सरकार मोठमोठी आश्वासन देऊन फक्त जाहीरातबाजी करत आहे. या आंदोलनात आप्पासाहेब जाधव, डॉ. उध्दव नाईकनवरे, शहराध्यक्ष अशोक आळणे, अॅड.दत्ता रांजवण, धनंजय सोळंके, सुनिल खंडागळे, अमोल डाके, राजेश जाधव, रामराजे सोळंके, प्रल्हाद सोळंके, दासु पाटील बादाडे, मुंजाबा जाधव, शरद नाईकनवरे, अभय मोहरिर, तिर्थराज पांचाळ, दिगांबर सोळंके, राजेश शहाणे, संदीप माने, भारत काळे, ईश्वर थेटे, युवराज पवार, सय्यद फारुक, मुरली धुमाळ, सचिन दळवी यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.