विसर्जन मिरवणुका काढण्यास परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:28+5:302021-09-15T04:39:28+5:30
बीड : कोरोना संसर्ग रुग्ण कमी झाले असले, तरी देखील धोका कायम आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकांना जिल्हा प्रशानाकडून ...
बीड : कोरोना संसर्ग रुग्ण कमी झाले असले, तरी देखील धोका कायम आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकांना जिल्हा प्रशानाकडून परवानगी देण्यात येणार नसून, नगरपालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जन केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.
येत्या १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यादिवशी सर्वजनिक गणेश मंडळ व घरातील गणपतीचे विसर्जन होणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा व पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी शांतता समितीच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जमावबंदी कलम लागू असल्याने गर्दी करण्यास परवानगी पूर्वीपासूनच नाकारलेली आहे. त्यामुळे नगरापालीच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. यासंदर्भात नगपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, कमी गर्दीमध्ये विसर्जन करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे. तर नागरिरकांनी देखील कोरोना संसर्ग नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी केले आहे.