ग्रामसेवक संपाचा कामावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:22 AM2019-08-31T00:22:51+5:302019-08-31T00:23:23+5:30

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम पंचायत समिती प्रशासनाच्या कामकाजावर झाला आहे. ग्रामीण स्तरावरील प्रश्नांसह, पाणीप्रश्न प्रलंबित राहिले आहेत.

Impact of Village Service Work | ग्रामसेवक संपाचा कामावर परिणाम

ग्रामसेवक संपाचा कामावर परिणाम

Next
ठळक मुद्देकामे होईनात : नागरिकांचे कामांसाठी हेलपाटे

गेवराई : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम पंचायत समिती प्रशासनाच्या कामकाजावर झाला आहे. ग्रामीण स्तरावरील प्रश्नांसह, पाणीप्रश्न प्रलंबित राहिले आहेत.
ग्रामसेवकांनी २२ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या वाढत्या मुक्कामामुळे ग्रामपंचायतस्तरावरील पेङन्सी अभिलेख वर्गीकरणाची कामे स्थानिक निधीचे सामान्य व विशेष लेखा परीक्षण जनता दरबारासह इतर प्रकारच्या तक्रारीच्या १०० टक्के निपटारा करणे, घरकुल योजनांचे प्रस्ताव ग्रामपंचायतस्तरावर गोळा करणे, त्यासाठी कॅम्प घेणे, नवीन मंजुर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे, घरकुल निर्मितीसाठी कृती आराखडा तयार करणे, महिलांचा बचतगटांमध्ये समावेश करणे, रोजगार हमी योजनांच्या कामांची यादी करून फलक लावणे जॉब कॉर्डची तपासणी अखर्चित निधीतील कामे ५ सप्टेंबरपर्यंत सुरू करणे, वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जबाबदारीसह जिल्हा परिषदेतील लाभांच्या वस्तूसाठी निवड झालेल्यांच्या घरी भेट देऊन वस्तू खरेदीसाठी त्यांना प्रोत्साहन देणे आदी कामे ठप्प झाले आहेत. ग्रामसेवक यांच्या निगडीत असलेले प्रश्न यामध्ये पाणीटंचाई घरकुल योजना रोहयोअंतर्गत येणाऱ्या विहिरी संबंधित प्रश्नांचा अधिक सामावेश आहे हे सर्व प्रश्न ग्रामसेवकांशी निगडीत आहेत. मात्र ग्रामसेवकांनी सुरू केलेले आंदोलन अजूनही संपायच नाव घेत नसल्याने हे प्रश्न आणखी किती दिवस लटकणार, असा प्रश्न ग्रामस्ंथामधून व्यक्त होत आहे.

Web Title: Impact of Village Service Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.