राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:32 AM2021-07-29T04:32:40+5:302021-07-29T04:32:40+5:30
तहसील कार्यालय सभागृहात अर्थसहाय्य व मंजुरी पत्राचे वाटप आमदार सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ ...
तहसील कार्यालय सभागृहात अर्थसहाय्य व मंजुरी पत्राचे वाटप आमदार सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तिचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील वारसाला एक रकमी २० हजार रुपये असे तालुक्यातील ५ लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये अर्थसहाय्य व संजय गांधी योजनेतील ३२ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र, श्रावण बाळ योजनेतील ५९ लाभार्थ्यांना आमदार सोळंके यांच्या हस्ते वडवणी तहसील येथे मंजुरीपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, बीडीओ मीनाक्षी कांबळे, माजी चेअरमन संभाजी शिंदे, सभापती दिनेश मस्के, संजय गांधी श्रावण बाळचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव भुजबळ, पंचायत समितीचे सभापती बळीराम आजबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, विनोदकुमार नहार, माजी सरपंच गंपू पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जेराव आळणे, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सांवत, संतोष पवार, नगरसेवक असल्म कुरेशी, संदिपान खळगे, नगरसेवक सतीश बडे, विश्वास आगे, ॲड. अंनद काळे, महादेव अंबुरे, सरपंच बिभीशेन खोटे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह लाभार्थी उपस्थित होते.
280721\20210727_161014_14.jpg