बीडमध्ये दोन ठिकाणी फटाका स्टॉलवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:13 AM2019-04-11T00:13:01+5:302019-04-11T00:13:50+5:30

शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली.

Impressions on crackers in two places in Beed | बीडमध्ये दोन ठिकाणी फटाका स्टॉलवर छापे

बीडमध्ये दोन ठिकाणी फटाका स्टॉलवर छापे

Next

बीड : शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत.
बीड शहर ठाणे हद्दीत लोकवस्ती असलेल्या बलभीम चौकात सुनीलकुमार गोवर्धनदास कुकडेजा (रा.बीड) हा अनधिकृतपणे फटाका विक्री करीत होता. तसेच मोठा साठाही त्याने करून ठेवला होता. त्याच्या गोदामावर छापा टाकून २ लाख ८८ हजार रूपयांचे फटाके जप्त केले. त्याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई होताच पेठबीड भागातील सतीष भगवानअप्पा नगरे (रा.बुरूडगल्ली, बीड) याच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये २ लाख ३४ हजार रूपयांचे फटाके जप्त करण्यात आले. दोन कारवायात मिळून ५ लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगरे विरोधात पेठबीड ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई पोउपनि रामकृष्ण सागडे, गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.
२ वर्षापूर्वीच परवाना रद्द
कुकडेजा आणि नगरे यांना शहरात फटाके विक्री करण्यास बंदी घातलेली आहे.
२०१७ सालीच त्यांचे शहरातील परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. दोघांनाही शहराबाहेर साठा करण्याची परवानगी आहे.
असे असतानाही त्यांनी लोकवस्तीत अनधिकृतपणे फटाक्यांचा साठा करून ठेवत नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका होईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Impressions on crackers in two places in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.