पाटोदा, आष्टीत हॉटेलवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:38 AM2019-03-25T00:38:19+5:302019-03-25T00:39:18+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. आष्टी व पाटोदा येथे तीन हॉटेल, ढाब्यांवर धाडी टाकून विदेशी दारू जप्त करण्यात आली.
बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. आष्टी व पाटोदा येथे तीन हॉटेल, ढाब्यांवर धाडी टाकून विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाया राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आल्या.
आष्टी पोलीस ठाणे हद्दीत हॉटेलवर छापा टाकून साडेसात हजार रूपयांची दारू जप्त केली. येथे गणेश विलास डोंगरे (रा.जामखेड जि. अहमदनगर) याच्याविरोधात कारवाई केली. तर पाटोदा हद्दीत नायगाव येथे धाब्यावर धाड टाकली. येथे ९ हजार रूपयांची दारू जप्त केली. शंकर ज्ञानदेव वनवे (४५ रा.नायगाव ता.पाटोदा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही कारवाया राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व्ही.एस.घुमरे, जवान सय्यद मस्के, चालक शेडके आदींनी केल्या.
एलसीबीनेही केली कारवाई
४स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव शिवारातील धाब्यावर धाड टाकली. येथे सहा हजार रूपयांची दारू जप्त करुन व एका आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोह. बालाजी दराडे, कल्याण तांदळे, सखाराम सारूक, साजिद पठाण, नरेंद्र बांगर, सतीश कातकडे, प्रशांत सुस्कर आदींनी ही कारवाई केली.