आता तरी सुधरा; नियम पाळा, कोरोना उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:30+5:302021-03-26T04:33:30+5:30

नितीन कांबळे कडा : एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाने सुरूवात केली आणि दोन हजार पंचेचाळीस लोकांना आजवर लागण होऊन ...

Improve now though; Follow the rules, Corona on the threshold | आता तरी सुधरा; नियम पाळा, कोरोना उंबरठ्यावर

आता तरी सुधरा; नियम पाळा, कोरोना उंबरठ्यावर

googlenewsNext

नितीन कांबळे

कडा : एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाने सुरूवात केली आणि दोन हजार पंचेचाळीस लोकांना आजवर लागण होऊन बेचाळीस लोकांना जीव गमवावा लागला. एवढे होत असताना कोरोना गेला म्हणून बिनधास्त नियम तोडून फिरल्याने आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. नागरिकांनो, नियम पाळा प्रशासनाला सहकार्य करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे आजवर रुग्ण सापडले असून मुत्यूचे प्रमाण देखील वाढले होते. नंतर कोरोना आटोक्यात आला म्हणत नियमावली शिथिल होताच नागरिक सुसाट झाले. मास्क नाही, सोशल डिस्टन्स नाही, सॅनिटायझर नाही की कसले गांभीर्य नसल्याने आता गेलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढत बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालल्याने प्रशासन सक्रिय झाले असले तरी नागरिकांना कसलेच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील जनतेला नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काय म्हणतात अधिकारी...

चिंता वाढली असून कोरोना संसर्ग वाढतोय कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रशासन कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, म्हणावे तेवढे यश जनतेच्या निष्काळजीपणामुळे येत नाहीये. तालुका पातळीवर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनाची धग गावकुसापर्यंत जाऊ शकते. यासाठी प्रशासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य करावे. लक्षणे दिसताच आरोग्य विभागाला कळवावे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.

तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासनातील सर्व अधिकारी यांची बैठक घेतली असून भरारी पथके, स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जाणार असून गर्दीच्या ठिकाणी वरवर लक्ष ठेवून नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या असून जनजागृतीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी लोकमतला सांगितले.

आष्टी,पाटोदा, शिरूर या तिनही तालुक्यात विनामास्क असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असून जनजागृती सुरू आहे. जनतेने देखील नियमाचे पालन करावे असे आवाहन आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Improve now though; Follow the rules, Corona on the threshold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.