अंबाजोगाईत गावठी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 07:10 PM2024-09-27T19:10:01+5:302024-09-27T19:10:48+5:30

यशवंतराव चव्हाण चौक परिसरात पोलिसांची कारवाई

In Ambajogai, the police have detained a youth who was carrying a Gavathi pistol | अंबाजोगाईत गावठी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अंबाजोगाईत गावठी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अंबाजोगाई (बीड) : कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असणार्‍या युवकाला स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात उघडकिस आला. 

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड, रा. सदर बाजार. हा युवक कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलिस हवालदार मारूती कांबळे यांनी आपल्या सहकार्यासह या परिसरात सापळा रचला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण चौक येथे एक इसम फिरत असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी मोठ्या शिताफिने त्या युवकास पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कमरेला गावठी कट्टा मिळून आला. तसेच गावठी बनावटीच्या पिस्टलसह चार जिवंत काडतुस अवैध रित्या मिळून आले. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेवून त्याच्या विरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलिस हवालदार मारूती कांबळे, राजू पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, गणेश मराडे यांचा समावेश होता.

अंबाजोगाई शहरात धाडसत्र सुरूच
जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासुन बीड जिल्ह्यातील अवैध धंदे , अवैध वाहतुक अशा कारवाया सुरूच आहेत. अंबाजोगाईत गेल्या दोन दिवासांपासुन गुन्हे शाखा बीड येथील पथक कार्यरत आहे. गुरूवारी १८० वाहनांवर कारवाया केल्यानंतर शुक्रवारीही मोहिम सुरूच होती. शुक्रवारी या पथकाने अवैध व्यवसायांवर धाडी टाकण्यासोबतच गावठी कट्टा ही जप्त केला.

Web Title: In Ambajogai, the police have detained a youth who was carrying a Gavathi pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.