बीडमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीवरील बांधकाम मिस्त्रीसह मजूर महिलेस चिरडले

By संजय तिपाले | Published: October 12, 2022 03:49 PM2022-10-12T15:49:00+5:302022-10-12T15:51:14+5:30

बीडजवळील घटना: मृतांत मजूर महिलेसह मिस्त्रीचा समावेश

In Beed, a speeding tempo crushed a woman laborer along with a construction mistri on a two-wheeler | बीडमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीवरील बांधकाम मिस्त्रीसह मजूर महिलेस चिरडले

बीडमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीवरील बांधकाम मिस्त्रीसह मजूर महिलेस चिरडले

Next

बीड: शहराजवळील छत्रपती संभाजी महाराज चौकालगत भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले. यात मजूर महिलेसह मिस्त्रीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. 

अनिता भारत सरपते (४१, रा. गोविंदनगर, धानोरा रोड, बीड) व कालिदास विठ्ठल जाधव (३८,रा. शेलगाव गांजी ता. केज) अशी मयतांची नावे आहेत. अनिता सरपते या बिगारी काम करत तर कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते. ते दोघे बांधकामावर कामासाठी दुचाकीवरून मांजरसुंबाकडे जात होते तर भरधाव टेम्पो (एमएच १५ एव्ही - १८४७) गेवराईकडे जात होता. धुळे- सोलापूर महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ टेम्पोने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. दुचाकी टेम्पोखाली अडकली. यात दोघेही जागीच ठार झाले. 

दरम्यान, अनिता सरपते यांचा मृतदेह टेम्पोखाली अडकला होता. अखेर क्रेनद्वारे तो बाहेर काढला. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक देविदास आवारे, हवालदार पी. टी. चव्हाण, आनंद मस्के यांनी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नातेवाईकांचा आक्रोश
दरम्यान, अपघातानंतर अनिता सरपते यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते.

Web Title: In Beed, a speeding tempo crushed a woman laborer along with a construction mistri on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.