Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या
By सोमनाथ खताळ | Published: October 30, 2023 12:06 PM2023-10-30T12:06:12+5:302023-10-30T12:07:28+5:30
काही समाजबांधवांनी घरात व खाली असलेल्या कार्यालयात प्रवेश केला. तेथील सर्व खूर्चा, टेबल बाहेर परिसरात आणले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले.
माजलगाव : काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले. आ.सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली.
सुरूवातीला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतू जमाव संतापलेला होता. काही तरूणांनी गेट तोडून घरात प्रवेश केला. घराच्या काचा फोडल्या. तसेच पार्किंगमधील तीन ते चार गाड्या आगोदर फोडल्या. त्यानंतर त्या पेटवून देण्यात आला. जवळपास हजारापेक्षा जास्त मराठा समाजबांधव घराभोवती जमले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही अपुरा पडत होता. दुपारी १२ पर्यंत जमा आ.सोळंके यांच्या घराजवळवच होता. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांची अधिक कुमक बोलवण्यात आली होती.
बीड: मराठा आरक्षण समर्थनार्थ माजलगाव बंद दरम्यान राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलकांची दगडफेक, गाड्या पेटविल्या. #MarathaReservationpic.twitter.com/ZOE5OQfU8J
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 30, 2023
कार्यालयातील खूर्च्याही बाहेर आणून जाळल्या
काही समाजबांधवांनी घरात व खाली असलेल्या कार्यालयात प्रवेश केला. तेथील सर्व खूर्चा, टेबल बाहेर परिसरात आणले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले. तसेच घरच्या परिसरात उभ्या चारचाकी, दुचाकी गाड्या देखील पेटवून देण्यात आल्या.
मी आरक्षणाच्या समर्थनार्थ
जमावाने दगडफेक केली तेव्हा मी घरातच होतो. संवादाची संधीच देण्यात आली नाही.पण सर्वांना नम्रपणे सांगतो की मी मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे.सर्वांच्या प्रेमामुळेच मी चार वेळा आमदार झाले, कोणावरही राग नाही.
- प्रकाश सोळंके, आमदार