माजलगावात ऑईल मिलला भीषण आग; लाखोंच्या सरकी, बारदानाची राख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:27 PM2023-04-14T23:27:12+5:302023-04-14T23:27:37+5:30

शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज

in Majalgaon Oil Mill Fire; Sarki, Bardana ash, loss of lakhs | माजलगावात ऑईल मिलला भीषण आग; लाखोंच्या सरकी, बारदानाची राख

माजलगावात ऑईल मिलला भीषण आग; लाखोंच्या सरकी, बारदानाची राख

googlenewsNext

माजलगाव (बीड): माजलगाव शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असणाऱ्या मुंदडा उद्योग समूहाच्या ऑईल मीलला आग लागली. ही आग आज संध्याकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान लागली असून यात मोठी आर्थिक हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

माजलगाव तालुक्यातील केसापुरी शिवारात असलेल्या माजलगाव – गेवराई रोडवर रामदयाल मुंदडा यांचे मुंदडा उद्योग समूह आहे. या ठिकाणी त्यांची दालमिल व ऑईल मिल आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक ऑईल मिलला आग लागली. या आगीत सरकी असलेले हजारो पोते जळून खाक झाली आहेत, तसेच लाखो रुपयांचा बारदाना देखील जळाला. अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीची भीषणता खूप असून वीजवण्यासाठी माजलगाव नगर परिषदचे अग्निशमन दल, मानवत नगर परिषदचे अग्निशमन दल, गेवराई नगर परिषदचे अग्निशमन दल, बीड नगर परिषदचे अग्निशमन दल, धारुर नगर परिषदचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न होत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, घटनास्थळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात होते. आग लागल्यानंतर जोराची हवा सुटल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे.

Web Title: in Majalgaon Oil Mill Fire; Sarki, Bardana ash, loss of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.