परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादावरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 07:31 PM2023-06-26T19:31:23+5:302023-06-26T19:31:41+5:30

आजच्या आठवडी बाजारावरून झाला वाद, एकजण गंभीर जखमी

In Parli, the two groups of third gender clashed over the border dispute between | परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादावरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले

परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादावरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले

googlenewsNext

परळी: तुम्ही येथे का आलात? असे म्हणून टोकवाडीच्या तीन तृतीयपंथी व अन्य चौघांनी अंबाजोगाईच्या पाच तृतीयपंथीना मारहाण केली. यात एका तृतीयपंथीय जखमी झालाअसून शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई टावर रोडवर घडली. 

शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते मोंढा मार्केट रस्त्यावर दर सोमवारी आठवडी बाजर भरतो. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजारात लोकांना पैस्यांची मदत मागण्यावरून टोकवाडी व अंबाजोगाई येथील तृतीयपंथीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात पूर्वा दिव्या बक्स ( 23 ,रा अंबाजोगाई) या जखमी झाल्या. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी दिव्या बक्स यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात टोकवाडीच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत

पिढीजात काम आहे
परळी शहर हे पूर्वजांपासून आमच्याकडे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून अन्य तृतीयपंथी आम्ही परळीचे रहिवासी आहोत. आम्हीच बाजार मागणार, असे म्हणत इतर तृतीयपंथीयांना मज्जाव करत आहेत. सात पिढ्यांपासून आम्ही बाजारात मदत गोळा करतो. येथे आमचे घर आहे. परळीतील तृतीयपंथीयांनी इतर लोकांना सोबत घेत केलेल्या हल्ल्याचा निषेध करते. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा.
- अंजली पटेल, तृतीयपंथीयांचे गुरु, उदगीर 

Web Title: In Parli, the two groups of third gender clashed over the border dispute between

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.