येत्या काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल,मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 02:01 PM2023-06-10T14:01:55+5:302023-06-10T14:05:48+5:30

''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, यानिमित्ताने सर्व सहकाऱ्यांना व राष्ट्रवादी प्रेमींना शुभेच्छा देतो''

In the future, the position of the party will be top in the state, the Chief Minister will be NCP: Dhananjay Munde | येत्या काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल,मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल: धनंजय मुंडे

येत्या काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल,मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल: धनंजय मुंडे

googlenewsNext

परळी - शरद पवार यांच्या नेतृत्वात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान राज्यात अव्वल असेल, व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल, असा विश्वास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळीत बोलताना व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आ. धनंजय मुंडे यांच्या परळीतील  जगमित्र संपर्क कार्यालयासमोरील प्रांगणात आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी राष्ट्रवादी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आ. मुंडे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, यानिमित्ताने सर्व सहकाऱ्यांना व राष्ट्रवादी प्रेमींना शुभेच्छा देतो, तसेच आगामी काळात पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त करतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.  यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिकराव कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जयपाल लाहोटी, वैजनाथ सोळंके, रवी मुळे, किशोर पारधे, दत्ता सावंत, सय्यद शिराज, गोविंद कराड, राजेंद्र सोनी, मजाज इनामदार, अन्नपूर्णा जाधव, डॉ. विनोद जगतकर, विजय भोईटे, रमेश भोईटे, वैजनाथ बागवाले, वसंतराव राठोड, संजय आघाव, लाला खान पठाण, रणजित सोळंके, सुरेश नानवटे, अमित केंद्रे, बळीराम नागरगोजे, बालाजी गित्ते, पवन फुटके यांसह आदी उपस्थित होते.

Web Title: In the future, the position of the party will be top in the state, the Chief Minister will be NCP: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.