सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीच्या कामाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:29+5:302021-05-29T04:25:29+5:30

बीड : बीड शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत, तसेच कोरोनाच्या या महामारीत या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ...

Inauguration of cement concrete road and drainage works | सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीच्या कामाचे उद्घाटन

सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीच्या कामाचे उद्घाटन

googlenewsNext

बीड : बीड शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत, तसेच कोरोनाच्या या महामारीत या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी बीड नगरपालिकेच्यावतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील गांधी नगर भागात विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि नाली कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी नगराध्यक्ष म्हणाले की, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शहरात विविध ठिकाणी विकासाची कामे केली जात आहेत. विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत गांधी नगर भागातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण व नाली कामाचे उद्घाटन झाल्याने कामाला सुरुवात झाली आहे.

शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू असून, ११२ कोटी रुपयांची अमृत अटल योजना आणल्याचे सांगत बीड शहरातील २०५० लोकसंख्येच्या अनुषंगाने पाइपलाइनची भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना आखली आहे. त्यामुळे शहराला पुढच्या काळात टँकरची वाट पाहावी लागणार नाही. या योजनेमुळे तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

बीड नगरपालिकेच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक जे कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे खरेदी करू शकत नाहीत, अशा नागरिकांना आजची परिस्थिती लक्षात घेता डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप केले. यात प्रामुख्याने थर्मलगण, ऑक्सिमीटर, मास्क सॅनिटायझर, ग्लोज देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षांनी नागरिकांना कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, तोंडाला मास्क लावणे, सतत हात धुणे व सोशल डिस्टन्स पाळण्याची विनंती केली. या भागात विकासाची कामे पूर्ण होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक संतोष गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ, अमोल पौळ, लक्ष्मण गलांडे, नामदेव गायकवाड, जिलानी बागवान, राजू गायकवाड, राम वाघमारे, दत्ता जाधव यांच्यासह गांधी नगर भागातील नागरिक उपस्थित होते.

===Photopath===

280521\28bed_7_28052021_14.jpg

===Caption===

शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधील गांधी नगर भागात विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरन आणि नाली कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले.

Web Title: Inauguration of cement concrete road and drainage works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.