परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 12:01 PM2022-08-13T12:01:00+5:302022-08-13T12:12:57+5:30

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण

Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

googlenewsNext

परळी (बीड) - परळीत १५० फुट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण आज सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान करण्यात आले. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्त करण्यात आले. 

वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. ध्वजाची उंची तब्बल १५० फूट आहे. याठिकाणी एलईडी स्पॉट लाईट, जनरेटर, सीसीटीव्ही, सेफ्टी वॉल कंपाउंड तसेच सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या विशाल तिरंगा ध्वजाचे आज सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मराठवाड्यात सर्वात उंच असणारा हा विशाल तिरंगा ध्वज उभारणे आणि सुशोभीकरणासाठी सुमारे ८२ लाख रुपये खर्च झाला आहे. वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या डोंगरावर हा तिरंगा ध्वज डौलाने फडकत असून दूरनही लक्ष वेधून घेत आहे. यामुळे परळीत आणखी एक टुरिस्ट स्पॉट तयार झाला आहे. परळीकर मोठ्या संख्येने लोकार्पणासाठी उपस्थित होते.

हर घर तिरंगा उपक्रम नव्हता तेव्हा आमचा संकल्प
देशात केंद्र सरकारने आझादी का अमृतमहोत्सव उपक्रमसुरु केला आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरात होत आहे. हा उपक्रम सुरु होण्याच्या पूर्वी शहरालगतच्या डोंगरावर तिरंगा ध्वजाची उभारणी करावी, असा संकल्प आम्ही केला होता. हे स्वप्न आज पूर्ण झाले. यापुढे परळीत येणारा प्रत्येकजण येथे आल्याशिवाय राहणार नाही.
- आ. धनंजय मुंडे, माजी मंत्री

Web Title: Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.