पदाधिकाऱ्यांकडून होणा-या सत्कारामुळे अधिका-यांना मिळते प्रोत्साहन : एम.डी. सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:56 AM2018-06-29T00:56:22+5:302018-06-29T00:57:06+5:30

Incentives to officials giving due respect to office bearers: M.D. Lion | पदाधिकाऱ्यांकडून होणा-या सत्कारामुळे अधिका-यांना मिळते प्रोत्साहन : एम.डी. सिंह

पदाधिकाऱ्यांकडून होणा-या सत्कारामुळे अधिका-यांना मिळते प्रोत्साहन : एम.डी. सिंह

googlenewsNext
ठळक मुद्देएम.डी.सिंह यांच्यामुळे जिल्ह्याचा गौरव : मेटे

बीड : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे कुशल प्रशासक असून कर्मचाºयांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्यामुळेच देशपातळीवर बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढला, अशा शब्दात सत्कार कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे यांनी जिल्हाधिकाºयांचा गौरव केला.

देशामध्ये पिक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये बीड जिल्ह्यास प्रथम क्र मांक मिळवून दिला. या कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. पीएमएफबीवाय अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २१ एप्रिल २०१८ रोजी नागरी सेवा दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून एम.डी. सिंह यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या विशेष कार्याची दखल घेऊन शिवसंग्राम संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आ. विनायक मेटे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कारप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना एम.डी. सिंह म्हणाले की, उत्कृष्ट पुरस्कार बीड जिल्ह्यातून मिळाला, याचा मला आनंद आहे. हा सत्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकारी कर्मचा-यांचा आहे. पदाधिकाºयांनी अधिकाºयांचा पुढाकार घेऊन सत्कार करणे हे पदाधिकाºयांच्या मनाचे मोठेपण आहे. या सत्कारामुळे निश्चितच प्रोत्साहन मिळाले आहे.

आ. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना ही सामाजिक व लोकांच्या हिताच्या कामांसाठी सदैव तत्पर असते. शहरातील स्वच्छता किंवा व्यसनमुक्तीसारखे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ते माझ्या संपर्कात आले, असे ते म्हणाले. या सत्कार समारंभाला राजेंद्र मस्के, भारत काळे, अ‍ॅड.राहुल मस्के, अशोक हिंगे, अनिल घुमरे, सुहास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी माने, गणेश निºहाळी, कांबळे, प्रियंका पवार, तहसीलदार शिंगटे, अशोक लोढा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र मस्के यांनी तर सूत्रसंचालन मारूती तिपाले यांनी केले.

Web Title: Incentives to officials giving due respect to office bearers: M.D. Lion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.