रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची संख्या वाढवा; अंबाजोगाईत निवासी डॉक्टरांचे लक्षवेधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 03:23 PM2021-04-17T15:23:18+5:302021-04-17T15:23:41+5:30

निवासी डॉक्टरांना त्यांच्या तज्ञ विषयांचा अभ्यासही महत्त्वपूर्ण असतो. अशा स्थितीतही हे डॉक्टर सेवा देत आहेत.

Increase the number of doctors for patient care; Notable agitation of resident doctors in Ambajogai | रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची संख्या वाढवा; अंबाजोगाईत निवासी डॉक्टरांचे लक्षवेधी आंदोलन

रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची संख्या वाढवा; अंबाजोगाईत निवासी डॉक्टरांचे लक्षवेधी आंदोलन

Next

अंबाजोगाई -  रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची संख्या वाढवा व निवासी डॉक्टरांवरील  रुग्णसेवेचा ताण कमी करा या व विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण कक्षासमोर लक्षवेधी आंदोलन केले. आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता यांना दिले.

गेल्या वर्षभरापासून निवासी डॉक्टर मोठ्या प्रमाणात कोरोना कक्षात कार्यरत आहेत. निवासी डॉक्टरांना त्यांच्या तज्ञ विषयांचा अभ्यासही महत्त्वपूर्ण असतो. अशा स्थितीतही हे डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे तज्ञ विषयांच्या अभ्यासक्रमाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात मार्ड या संघटनेने वारंवार या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले तरीही प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सकाळी लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले. 

कोविड विशेष डॉक्टर्स म्हणून रुग्णालयात मनुष्यबळ वाढवा. डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या पीपीई कीट व एन-९५ मास्कचा दर्जा उत्तम प्रतिचा द्या. कोरोना कक्षात डयुट्या देतांना सर्व विभागात सातत्या ठेवा. सुरक्षारक्षकांची वाढ करा. रुग्णालयातील रिक्त जागा तात्काळ भरा. अशा विविध मागण्या प्रशासनाकडे मांडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व मार्डचे अध्यक्ष डॉ. केदारनाथ कुटे, कार्याध्यक्ष सुमीत साबळे, सचिव डॉ. विद्या लवंद यांच्यासह निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने या लक्षवेधी आंदोलनात सहभागी झाले होते. 

Web Title: Increase the number of doctors for patient care; Notable agitation of resident doctors in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.