पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने बॅरेजेसचे गेट तुटले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:35+5:302021-09-27T04:36:35+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई व केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने कानडी बोरगाव, अंजनपूर येथील बॅरेजेसचे चार गेट तुटले ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई व केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने कानडी बोरगाव, अंजनपूर येथील बॅरेजेसचे चार गेट तुटले आहेत. हे गेट तत्काळ दुरूस्त करून संभाव्य धोका टाळावा, अशा सूचना आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केल्या. शनिवारी आ .नमिता मुंदडा यांनी अतिवृष्टी झालेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गेटची दुरूस्ती, लाईटची व्यवस्था, रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याची सूचना केली. या बंधाऱ्याचे ऑटोमॅटिक गेटचा प्रस्ताव तयार करण्यास सांगून धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती व लाईनिंगचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगताप, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता शाहूराव पाटील उपस्थित होते. यावेळी तट बोरगाव, अंजनपूर, कानडी बोरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
250921\2936img-20210925-wa0077.jpg
आ नमिता मुंदडा