महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:34 AM2021-05-27T04:34:34+5:302021-05-27T04:34:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून कामकाजाचे नियोजन करत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून कामकाजाचे नियोजन करत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून २८ शेती शाळांपैकी ८ शेतीशाळा स्वतंत्र महिला शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.
शिरूर तालुक्यात यंदा साधारणपणे ५० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा गृहीत धरला आहे. त्यात कापूस लागवड २८ हजार ८७८, बाजरी ५ हजार २२०, तर तुरीचे १० हजार ३२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. शिवाय अन्य पेरा होणार आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांना व महिला शेतकऱ्यांना पीक निहाय संपूर्ण मार्गदर्शन करण्याकरिता शेतीशाळा घेऊन केले जाणार आहे. पिकांची वाढ, खताची मात्रा, रोग प्रतिबंधासाठी औषधी कोणती, प्रमाण किती अशी माहिती शेती शाळेकडून कृषितज्ज्ञ देत आहेत. कृषी विभागाकडून २४ कृषी सहाय्यक, ४ कृषी पर्यवेक्षकासह अन्य कृषी कर्मचारी शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी तयार असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी सांगितले.
....
===Photopath===
260521\vijaykumar gadekar_img-20210526-wa0023_14.jpg
===Caption===
गतवर्षी शिरुर तालुक्यात महिला शेतीशाळेत मार्गदर्शन करतानााना कृषी सहाय्यक कविता ढाकणे.