बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचे स्वतंत्र पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:36 AM2021-08-26T04:36:13+5:302021-08-26T04:36:13+5:30

कडा : पैठण - बारामती रोडलगत असलेल्या धस वस्तीवर उसाच्या शेतात रविवारी दुपारी चार ते पाच दरम्यान एका ...

Independent Forest Department team deployed to search for leopards | बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचे स्वतंत्र पथक तैनात

बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचे स्वतंत्र पथक तैनात

Next

कडा : पैठण - बारामती रोडलगत असलेल्या धस वस्तीवर उसाच्या शेतात रविवारी दुपारी चार ते पाच दरम्यान एका शेतकऱ्याला बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने सर्तकतेचा इशारा दिला आहे तसेच बिबट्याच्या शोधासाठी एक स्वतंत्र फिरते पथक तैनात करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी ‘लोकमत’ला दिली.

आष्टी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. याची मनातील भीती संपत नाही तोच आता परत चोभानिमगांव परिसरातील सोपान बापू थेटे या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात रविवारी बिबट्याने अचानक दर्शन दिल्याने तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र फिरते पथक तैनात केले आहे. नागरिकांनी सावध भूमिका ठेवावी, कुठे बिबट्या दिसला तर वनविभागाला कळवावे तसेच स्वत: काळजी घेऊन काम करावे. वाढलेले उसाचे क्षेत्र व तूरदेखील मोठी होऊ लागल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले.

Web Title: Independent Forest Department team deployed to search for leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.