आत्महत्येस प्रवृत्त केले; सासरच्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:00 AM2019-08-22T00:00:58+5:302019-08-22T00:02:03+5:30
शहरातील लक्ष्मीनगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील लक्ष्मीनगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजश्री राम गायकवाड (वय २५) आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. राजश्रीला ३ वर्षाचा एक मुलगा आहे. ती शहरातील लक्ष्मीनगर भागात पती, सासू व सासºयासोबत राहत होती. राजश्री हिचे माहेर नाळवंडी (ता.जी.बीड) हे आहे. ती रक्षाबंधनसाठी माहेरी गेली होती, परंतु तिने घरची परिस्थिती कोणालाही सांगितली नव्हती अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ती बीड येथे घरी आली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती राम गायकवाड, सासू पुष्पा प्रभाकर गायकवाड, सासरे प्रभाकर गायकवाड यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरच्यांच्या फिर्यादीनूसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्रीचा पती राम हा कायम दारू पिऊन येत होता. तसेच तिला मानसिक त्रास देत मारहाण केली जात होती. तसेच सासूचा देखील जाच होता. मात्र, हा त्रास असहाय्य झाल्याने राजश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.
दरम्यान ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी सासू व राजश्री या दोघींच घरी होत्या. पती हा कामानिमित्त पुणे येथे गेला होता. हा प्रकार घडल्यानंतर सासू पुष्पा व सासरे प्रभार यांनी पलायन केले आहे, तर पती राम गायकवाड याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील लक्ष्मीनगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासºयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजश्री राम गायकवाड (वय २५) आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. राजश्रीला ३ वर्षाचा एक मुलगा आहे. ती शहरातील लक्ष्मीनगर भागात पती, सासू व सासºयासोबत राहत होती. राजश्री हिचे माहेर नाळवंडी (ता.जी.बीड) हे आहे. ती रक्षाबंधनसाठी माहेरी गेली होती, परंतु तिने घरची परिस्थिती कोणालाही सांगितली नव्हती अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ती बीड येथे घरी आली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती राम गायकवाड, सासू पुष्पा प्रभाकर गायकवाड, सासरे प्रभाकर गायकवाड यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरच्यांच्या फिर्यादीनूसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्रीचा पती राम हा कायम दारू पिऊन येत होता. तसेच तिला मानसिक त्रास देत मारहाण केली जात होती. तसेच सासूचा देखील जाच होता. मात्र, हा त्रास असहाय्य झाल्याने राजश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.
दरम्यान ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी सासू व राजश्री या दोघींच घरी होत्या. पती हा कामानिमित्त पुणे येथे गेला होता. हा प्रकार घडल्यानंतर सासू पुष्पा व सासरे प्रभार यांनी पलायन केले आहे, तर पती राम गायकवाड याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.