औद्योगिक बर्फ ठरतोय आरोग्यास धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:38+5:302021-04-20T04:34:38+5:30
अंबाजोगाई : औद्योगिक बर्फ नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. रस्त्यावर विकला जाणारा बर्फगोळा, गारीगार, कुल्फी, लिंबू सरबत, उसाचा रस ...
अंबाजोगाई : औद्योगिक बर्फ नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. रस्त्यावर विकला जाणारा बर्फगोळा, गारीगार, कुल्फी, लिंबू सरबत, उसाचा रस आदींमध्ये सर्रास वापला जाणारा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होते? असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे अन्न-औषध प्रशासन विभाग सर्रास डोळेझाक करीत असल्याचा आरोप होते? आहे. तापमानाने चाळिशी ओलांडलेल्या अंगाची लाहीलाही होते? आहे. त्यामुळे शीतपेय विक्रेत्यांकडे गर्दी वाढू लागली आहे. बर्फाचा गोळेवाला, सरबतवाला दिसल्यावर अनेकांना मोह आवरत नाही. चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयात टाकण्यात येणारा बर्फ कुठून येतो. तो कसा तयार होतो, बर्फ तयार करण्याच्या जागी आरोग्यदायी वातावरण आहे की,नाही याची कुणीही खातरजमा करत नाही. बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या कुलिंगसाठीच अखाद्य बर्फ तयार करतात.
'आईसक्युब' हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोजक्याच ठिकाणी होतो. तर कुलिंगसाठीचा बर्फ कमी खर्चिक असल्याने तो मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे. बर्फ बनविणाऱ्या कंपन्या औद्योगिक वापराचा बर्फ मोठ्या आकाराचा व जास्त काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनांना थंडावा देण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतानाही अन्न-औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू आहे.
अशुद्ध पाण्यापासून बर्फ
पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरात येणारे पाणी निर्जंतूक आहे की नाही, याचीही तपासणी होत नाही. बहुसंख्य बर्फ अस्वच्छ पाण्यापासूनच तयार असल्याचे चित्र आहे. बर्फ साठवण्याची जागा स्वच्छ नसते. बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. दिवसभर बर्फ त्यातच असतो.