अर्भक प्रकरणांची पाळेमुळे लातूरपर्यंत

By Admin | Published: December 22, 2015 12:46 AM2015-12-22T00:46:43+5:302015-12-22T00:51:14+5:30

मोहोळमधून महिला ताब्यात : अर्भकांचा अनैतिक संबंधातून जन्म

Infant tumor causes Latur | अर्भक प्रकरणांची पाळेमुळे लातूरपर्यंत

अर्भक प्रकरणांची पाळेमुळे लातूरपर्यंत

googlenewsNext


सावंतवाडी : लातूर जिल्ह्यातील उमरगा येथे एका महिलेला अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांची विक्री करण्यासाठीच बेळगाव येथील आरोपींनी सिंधुदुग येथील ‘भक्ती’सी संपर्क साधल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी आरोपींना संपर्क करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील ‘सुजाता’ नामक महिलेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस उमरग्यातील अर्भक विकणाऱ्या महिलेचा शोध घेत असून, या प्रकरणाची पाळेमुळे लातूरपर्यंत पोहोचली आहेत.
सावंतवाडी पोलिसांच्या सहकार्याने बेळगाव पोलिसांनी पकडलेल्या अब्दुल करीम नदाफ (वय ४२) रूपा रामचंद्र टकले (३६) या दोघा आरोपींना घेऊन बेळगावचे पोलीस रविवारी पंढरपूर येथे गेले होते. तेथे पोलिसांनी काही संशयितांची कसून चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीतून अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. आरोपी रूपा टकले हिने आपणास सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील सुजाता नामक महिलेने संपर्क साधल्याचे म्हटले आहे.
या माहितीवरून बेळगाव पोलिसांनी सोमवारी सकाळी मोहोळ गाठले. तेथे सुजाता हिला ताब्यात घेतले असून, तिच्याकडे चौकशी केली असता लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील एका महिलेने अनैतिक संबंधातून एका अर्भकाला जन्म दिला होता. हे अर्भक ती महिला एसटी बसस्थानकावर सोडून देण्याच्या विचारात होती. मात्र, सुजाता हिने तू अर्भक सोडून देऊ नको, ते कोणाला तरी विकूया आणि त्यातून पैसे घेऊया, असा सल्ला दिला होता. त्यानंतरच सुजाता हिने बेळगाव येथील अब्दुल करीम नदाफ व रूपा रामचंद्र टकले यांना फोन करून सौदा पक्का केला होता. (प्रतिनिधी)


उमरग्यातील महिलेच्या शोधानंतर भक्तीचा शोध
बेळगाव पोलीस या प्रकरणात उमरगा येथील एका महिलेला ताब्यात घेणार असून, तिच्याकडे सखोल तपास केल्यानंतरच पोलीस शिरोडा येथील भक्तीचा शोध घेणार आहेत. सध्या तरी पोलीस आरोपीच्या मोबाईलवर यापूर्वी भक्तीचा फोन आला होता का? याचा शोध घेत आहेत.

तपासात अडचणी : सुरेश कुंभार
अांगणेवाडीच्या जत्रेत शिरोडा येथील भक्ती नामक महिला तिला भेटली आणि तिने हे मूल विकत मागितले होते. ते मूल ती त्यांना विकणार होती. तत्पूर्वीच दोघेही आरोपी पोलिसांच्या जाळ््यात सापडले. बेळगाव पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप उमरगा येथील महिलेला ताब्यात घ्यायचे असून, आरोपी या महिलेबाबत योग्य ती माहिती देत नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत, असे कुंभार यांनी सांगितले.

Web Title: Infant tumor causes Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.