मैंदवाडी येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:32+5:302021-04-17T04:33:32+5:30
उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना विकास गंगाधर होळंबे यांनी एक निवेदन देऊन रस्त्याच्या कामाचे देयक संबंधित कंत्राटदाराला ...
उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंबाजोगाई यांना विकास गंगाधर होळंबे यांनी एक निवेदन देऊन रस्त्याच्या कामाचे देयक संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. मैंदवाडी येथील रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून ठेकेदाराने बोगस पद्धतीने येथे काम केले आहे कामाकरिता वाळू या खनिजाचा वापर न करता ‘इको सँड’चा वापर केला आहे.
सिमेंट व स्टीलचा वापर न करता काम केले असल्याचे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सदरील कामाचे बिल अदा करू नये तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण रस्ता एक महिन्याच्या आतच माती झालेला असून रस्ता केला होता का नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत मैंदवाडीचे ग्रामसेवक संजय नेटके यांना विचारले असता पाहणी करून चौकशी करावी लागेल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
===Photopath===
160421\narshingh suryvanshi_img-20210412-wa0021_14.jpg