गेवराई तालुक्यातील गावागावात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:24+5:302021-04-29T04:25:24+5:30

गेवराई : तालुक्यात कोरोनाबाधितांचा दररोज शंभरचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या शंभर रूग्णांमध्ये ...

Infiltration of corona in villages of Gevrai taluka | गेवराई तालुक्यातील गावागावात कोरोनाचा शिरकाव

गेवराई तालुक्यातील गावागावात कोरोनाचा शिरकाव

Next

गेवराई : तालुक्यात कोरोनाबाधितांचा दररोज शंभरचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या शंभर रूग्णांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागातील रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. शहरात १० तर ग्रामीण भागात ९० टक्के रूग्ण दररोज आढळत आहेत. नागरिकांनी काही लक्षणे असतील तर वेळेतच डाॅक्टरांचाना सल्ला घ्यावा तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये,मास्क घालावा,सोशल डिस्टन्स ठेवावा असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे व येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.

गेवराई तालुक्यात एक महिन्यापुर्वी १०ते १२ असा असलेला कोरोना रूग्णांचा आकडा गेल्या महिन्यापासून शंभरी पार करत आहे. त्यामुळे येथील कोविड सेंटर अपुरे पडत आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार शहरात फक्त दहा किंवा पंधराच रूग्ण निघत आहेत. उर्वरित ८० ते ९० टक्के रूग्ण हे आता ग्रामीण भागातील निघत असल्याने कोरोना गावागावात पोहचल्याचे दिसत आहे. तालुक्यातीलजातेगांव,उमापुर,गढी,खळेगाव,ताकडगाव,कोळगावसह सर्वच १८३ गावांत कोरोनाचा रोगाचा शिरकाव झाला आहे. ग्रामीण भागात वाढत्या रूग्ण संख्येमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.

पुर्वी कोरोनाचे रूग्ण फक्त शहरातच जास्त आढळत होते. आता ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. यात दररोज शंभरच्यावर रूग्ण निघत आहेत. या पैकी १० ते १५ रूग्ण हे शहरातील आहेत.बाकी सर्व रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टन्स राखावा,गर्दी करू नये असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी केले.

Web Title: Infiltration of corona in villages of Gevrai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.