महागाईने तेल ओतले ; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:46+5:302021-09-08T04:39:46+5:30

खाद्यतेल भडकले, डाळी वाढल्या, मसाल्यांनी तर दुप्पटीकडे वाटचाल केली. चहाचे भाव नकळत पाचशेच्या पुढे गेले तर उरली सुरली साखर ...

Inflation poured oil; Home budget went bad! | महागाईने तेल ओतले ; घरातले बजेट बिघडले !

महागाईने तेल ओतले ; घरातले बजेट बिघडले !

Next

खाद्यतेल भडकले, डाळी वाढल्या, मसाल्यांनी तर दुप्पटीकडे वाटचाल केली. चहाचे भाव नकळत पाचशेच्या पुढे गेले तर उरली सुरली साखर ही कडू झाली. अनेकांचा रोजगार बुडाला, नोकऱ्या गेल्या, व्यावसायिकांचा भांडवली खर्च वाढला आणि मध्यमवर्गीय व सामान्यांची होरपळ वाढत्या महागाईमुळे सुरूच आहे. चार ते पाच सदस्यांच्या घरात किराणा व जीवनावश्यक वस्तूंवर जानेवारी चार ते पाच हजारांचा खर्च व्हायचा, आता तो सहा ते सात हजारापर्यंत झाला आहे. त्यामुळे घरातले बजेट बिघडले आहे.

चार ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्य तेल १६०

धान्य १२५

शेंगदाणे ५०

साखर २५

साबुदाणा १०

चहा पुडा १८०

डाळी ८०

इतर खाद्यपदार्थ ३५०

गॅस सिलिंडर १८०

पेट्रोल डिझेल ३००

एकूण १४६०

डाळी शिवाय वरण कसे

कोरोना लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढली. यात डाळींचे प्रमाण जास्त होते. बाजारातील चढ- उतार आणि होणारी आवक व मागणी पाहता आतापर्यंत किलोमागे डाळींच्या दरात १० ते १५ रूपयांची वाढ झाली. सध्या पावसाळ्यात फळभाज्यांकडे कल आहे. डाळी शिवाय वरण कसे होईल. मसूर, तूरडाळ आणि मूग डाळीला चांगली मागणी आहे. पर्याय नसल्याने डाळ खरेदी करावीच लागते. त्याचबरोबर इतर पदार्थांचे दर पाहता फोडणी देखील महाग झाली आहे.

अशी वाढली महागाई

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रति किलो रूपयात)

शेंगदाणा तेल १५० १८५

सोयाबीन तेल १३० १५५

सूर्यफूल तेल १४५ १७०

शेंगदाणे ९० ११५

साखर ३५ ४०

साबुदाणा ५५ ६०

मसाले ६०० १०००

चहा पुडा ३८० ५००

तूर डाळ ९५ १०५

मूग डाळ १०० ११०

उडीद डाळ ९५ १०५

हरभरा डाळ ६० ७५

४) सिलिंडर हजाराच्या घरात (बॉक्स)

जीवनावश्यक वस्तूंच्या दर सोबतच घरगुती वापराचे गॅस सिलिंडरचे दर पंधरा दिवस- महिन्याला २५ ते ५० रूपयांपर्यंत वाढत आहेत. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत जवळपास दोनशे रूपयांनी गॅस सिलिंडरचे भाव वाढले आहेत. सध्या ९११ रूपये मोजावे लागतात. यातच डिलेव्हरी बॉयला चहापाण्यासाठी २० किंवा रिक्षासाठी ५० रूपये मोजावे लागतात. त्यामुळे सिलिंडर एक हजाराच्या घरात पोहचले आहे.

५) दिवाळीपासून ते आतापर्यंतच्या महागाईने आमचे किचन बजेट बिघडले आहे. जानेवारीत किराणा व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी चार ते साडेचार हजार रूपये लागत होते. सध्या तेवढ्याच वस्तूंसाठी सहा हजाराच्या आसपास खर्च करावा लागत आहे.

-- राणी राजीव जोगदंड, गृहिणी, बीड.

----------

फोडणीसाठी तेल, चवीसाठी मसाले, पोळी, भाकरीसाठी धान्य, चहासाठी साखरपत्ती, वरणासाठी डाळ लागतेच, सगळा किराणा महाग झाला आहे. गॅस सिलिंडरही हजार रूपयांना झाले. जानेवारीत किराणाची पट्टी पाच हजारापर्यंत व्हायची, मात्र आता दीड - दोन हजार जास्त मोजावे लागत आहे.

-- संगीता भागवत दोडके, गृहिणी, बीड.

----------

Web Title: Inflation poured oil; Home budget went bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.