हरभऱ्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:05+5:302021-03-14T04:30:05+5:30

हरभऱ्याची आवक वाढली अंबेजोगाई : तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाचे खळे करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचा ...

The influx of gram increased | हरभऱ्याची आवक वाढली

हरभऱ्याची आवक वाढली

Next

हरभऱ्याची आवक वाढली

अंबेजोगाई : तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाचे खळे करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात निघाले. आता बाजारपेठेत हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे. बाजार समितीत हरभऱ्याचा दर ४,७०० ते ४,८०० रुपये आहे, तर शासकीय खरेदी ५,१०० भावाने असल्याने हरभरा घालायचा कुठे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गॅस दरवाढीने नाराजी

अंबाजोगाई : सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने, महिला वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या बरोबरच गॅसचे दर वाढल्याने महिला वर्गाचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सिलिंडरच्या दरवाढीत दिवसेंदिवस सातत्याने वाढच होऊ लागली आहे. सामान्य ग्राहकांना गॅस वापरणे परवडणारे राहिले नाही. रॉकेलही बंद झाले. सरपणही महाग झाले. अशा स्थितीत महागाईने मिळणारा गॅस वापरण्याशिवाय दुसरा पर्याय सामान्य नागरिकांकडे राहिला नाही.

शेतीच्या कामांना सुरुवात

अंबेजोगाई : सध्या रब्बी हंगामातील पिकाची काढणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. गहू, हरभरा, ज्वारी, करडई ही पिके आता काढणीसाठी आली आहेत. सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी काढणी सुरू असल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे, तर ज्या शेतकऱ्यांची काढणी, मळणी पूर्ण झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे.

लाइनमनचा अभाव

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात महावितरणच्या वतीने गावोगावी असणाऱ्या लाइनमनची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अनेक लाइनमन सेवानिवृत्त झाले. त्या जागेवर शासनाच्या वतीने अजून नवीन लाइनमनची नियुक्ती झाली नाही. एकाच लाइनमनकडे चार-चार गावचा पदभार असल्याने शेतीतील कामे खोळंबत आहे. लाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर, लाइनमनला शोधण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागते. रिक्त लाइनमनच्या जागा भराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.

मॉस्कविनाच बसमध्ये प्रवास

अंबेजोगाई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असला, तरी नागरिक कोरोनापासूनच्या सुरक्षिततेबाबत अजूनही गांभीर्य बाळगायला तयार नाहीत. मास्कशिवाय बसमध्ये प्रवेश नाही, असा आदेश शासनाने काढला. असे आदेश असतानाही अंबेजोगाईच्या आगारामधून अजूनही अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करत आहेत. वाहकाने मास्क घालण्याबद्दल सांगताच, वाहकाशी हुज्जत घालण्याचे प्रमाण प्रवाशांकडून होत आहे.

अनियमित वीजपुरवठा शेतकरी त्रस्त

अंबेजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने, उसाला पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू आहे. या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने, सर्वच गावांमध्ये जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. पाण्याची उपलब्धता असली, तरी महावितरणच्या वतीने होणार अनियमित वीजपुरवठा शेतकऱ्यांना त्रस्त करू लागला आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी मुडेगांव येथील शेतकरी विलास जगताप यांनी केली आहे.

Web Title: The influx of gram increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.