माहिती अधिकारातून माहिती मागवताच काम केले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:26 AM2018-09-22T00:26:43+5:302018-09-22T00:27:28+5:30

तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीला आलेला चौदाव्या वित्त आयोगातील निधी सरपंच व ग्रामसेवक यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर गावातील एका तरुणाने माहिती अधिकारातून माहिती मागविली असताना सरपंच व ग्रामसेवक यांनी पाण्याच्या हौदाचे बांधकाम सुरु केले आहे. दरम्यान शासनाच्या योजनेतील अन्य कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या चौकशी करुन कारवाई करावी. तसेच दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

The information is right from the right to information | माहिती अधिकारातून माहिती मागवताच काम केले सुरू

माहिती अधिकारातून माहिती मागवताच काम केले सुरू

Next
ठळक मुद्देनिधी हडप करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीला आलेला चौदाव्या वित्त आयोगातील निधी सरपंच व ग्रामसेवक यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर गावातील एका तरुणाने माहिती अधिकारातून माहिती मागविली असताना सरपंच व ग्रामसेवक यांनी पाण्याच्या हौदाचे बांधकाम सुरु केले आहे. दरम्यान शासनाच्या योजनेतील अन्य कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या चौकशी करुन कारवाई करावी. तसेच दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील जि. प. सर्कल असलेल्या रेवकी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रामस्थांना अंधरात ठेवून कागदोपत्री ग्रामसभा घेतल्या आहेत. शिवाय निधी देखील हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. पथदिवे, पाईपलाईन, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, पाण्याचा हौद आदी कामे चौदाव्या वित्त आयोगातून केल्याचे दाखविण्यात आली आहेत.
गावातीलच तरुण संतोष शेजाळ याने माहितीच्या अधिकाराचा वापर करत माहिती मागितली होती. त्यांना धमकावण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान शुक्रवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाºयांना निवेदन देत कारवाई न झाल्यास पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला.
कारवाईची मागणी
सरपंच व ग्रामसेवकाने कामे न करताच निधी उचलला, याप्रकरणी चौकशी करुन कामांची पाहणी करावी व संबंधितांवर वरिष्ठांकडून कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: The information is right from the right to information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.