परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव वाचनप्रेरक उपक्रम, दिवाळी अंक वाचनकक्षाची केली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 06:32 PM2017-10-28T18:32:13+5:302017-10-28T18:33:37+5:30
शहरातील वाचन प्रेमींना या दिवाळीत प्रसिद्ध झालेली सर्व नामांकित दिवाळी अंक एकाच छताखाली वाचता यावी या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनव उप्रकम राबविण्यात आला आहे.
परळी ( बीड ) - शहरातील वाचन प्रेमींना या दिवाळीत प्रसिद्ध झालेली सर्व नामांकित दिवाळी अंक एकाच छताखाली वाचता यावी या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनव उप्रकम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पक्षाच्या शहर कार्यलायात जवळपास २०० विविध प्रकाशनाची दिवाळी अंक असलेला वाचनकक्ष आज सुरु करण्यात आला.
उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मधु जामकर, प्रमुख अतिथि सुप्रसिद्ध कवी अरुण पवार, डॉ.संतोष मुंडे, गोपाळ आंधळे, जयपाल लाहोटी, संतोष शिंदे, संजय फड, राजेन्द्र सोनी जयप्रकाश लड्डा, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय खाकरे, रानबा गायकवाड, संपादक रामप्रसाद गरड, प्रकाश सूर्यकर, श्रीकांत मांडे, प्रविण फुटके, प्रेमनाथ कदम, प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. चंद्रशेखर कणसे, प्रा.डॉ.सुनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहरातील साहित्यिक, विविध वृत्तपत्रांचे संपादक, वार्ताहर, पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. परळी शहरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत असुन राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अभिनव उपक्रम वाचनप्रेरक असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. हा उपक्रम विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शनातून साकार झाला असून वाचन संस्कृतीवाढीसाठी सदैव कार्य करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच या वाचनकक्षात विविध प्रकाशनाचे 200 नामांकित अंक वाचनप्रेमीसाठी उपलब्ध आहेत. दररोज सकाळी 10 ते 7 या वेळेत अंक येथे वाचनासाठी सर्वाना उपलब्ध असून वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कवी अरूण पवार, संजय खाकरे, रानबा गायकवाड, संतोष मुंडे यांनी ही मनोगत व्यक्त केले.