समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी गावांतील कामाची पाहणी व मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:22+5:302021-07-30T04:35:22+5:30
पाणी फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर शरद भनगडे यांच्या समवेत देवठाना येथील शेतकरी, जलमित्र यांच्या सोबत समृद्ध गाव स्पर्धेविषयी चर्चासत्रात ...
पाणी फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर शरद भनगडे यांच्या समवेत देवठाना येथील शेतकरी, जलमित्र यांच्या सोबत समृद्ध गाव स्पर्धेविषयी चर्चासत्रात गावकऱ्यांना वॉटरकपमध्ये केलेल्या कामाची, जलव्यवस्थापनासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा गावाला आपल्या गावचे ठोकताळे ठरवण्यासाठी कसा उपयोग होणार आहे हे समजावून सांगण्यात आले. शेतीचा जमा-खर्च डायरीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सोयाबीन कार्यशाळामधील व्हिडीओ आवश्यक पाहण्यास सांगण्यात आले. जास्त पावसामुळे चीबड होऊन गेलेल्या सोयाबीनची पाहणी केली. बीएफने पेरणी का महत्त्वाची आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जायभायवाडी येथील शेतकरी व जलमित्र यांची बैठक घेऊन समृद्ध गाव स्पर्धेविषयी व आपण केलेले सर्वेक्षण जलव्यवस्थापनासाठी कसे महत्त्वाचे हे समजावून सांगण्यात आले. गटशेती, जोडव्यवसाय, शेतकरी जमा-खर्च डायरीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तर मोरफळी येथे नाला खोलीकरण झालेल्या काठावर बांबू रोपे लागवड करण्यात आली. उपस्थित सरपंच शेषेराव गडदे, ग्रामपंचायत कर्मचारी, बचतगटाच्या महिला सदस्य व गावातील युवक यांनी बांबू लागवड करण्यासाठी सहकार्य केले. तसेच गावातील नवीन फळबाग लागवड करणाऱ्या शेतकरी यांच्या डाळिंब, मिरची लागवड, तसेच शेळीपालन व्यवसाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत तालुका समन्वयक नितीन पाटुळे होते. समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी देवठाना, आम्ला, आसोला, कोळपिंप्री आदी गावांना भेटी देऊन कामाची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
290721\img-20210729-wa0023.jpg~290721\img-20210728-wa0100.jpg
समृध्द ग्रामस्पर्धेत सहभागी गावात~समृध्द ग्राम स्पर्धेत सहभागी गावात मार्गदर्शन करताना