बीडकरांची प्रेरणादायी कृती; कर्तव्य बजावून परतलेल्या कोरोनायोद्धा परिचारीकेला दिली तोफांची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 07:17 PM2020-06-18T19:17:53+5:302020-06-18T19:19:53+5:30
परिचारीकेचे चक्त तोफा, बँडबाजा अन् औक्षण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
बीड : अनेक ठिकाणी कोरोना वार्डमध्ये कर्तव्य बजावून परत आल्यावर कॉलनी, परिसरातील लोकांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. परंतु बीडमध्ये एका परिचारीकेचे चक्त तोफा, बँडबाजा अन् औक्षण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. बीडकरांनी या निमित्ताने कोरोना योद्धांना लढण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
जिल्हा रुग्णालयात सिमा संतोष जायभाये-विघ्ने यांनी कोरोनाा वॉर्डमध्ये कर्तव्य बजावले. त्यानंतर बुधवारी त्या घरी परतल्या. राधानगरी, बीड या भागातील रहिवाशांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्यावर फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, तोफांची सलामी अन् महिलांनी औक्षण करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. हे करताना प्रत्येकाने तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतर ठेवले होते. अशा स्वागताने लढण्यास बळ मिळत असल्याचे सिमा यांनी सांगितले. हा जल्लोष पाहून त्यांना आनंदाश्रू अनावर झाले.