बीडच्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:06+5:302021-05-22T04:31:06+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या लाटेचा उद्रेक झाल्याने ७० हजारांवर लोक बाधित झाले आहेत. शासनाच्या आणि आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ...
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या लाटेचा उद्रेक झाल्याने ७० हजारांवर लोक बाधित झाले आहेत. शासनाच्या आणि आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तसेच लोकप्रतिनिधींच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत जवळपास १५०० वर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बीड शहरात कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांची संख्या जास्त असल्याने तिथे व शासकीय रुग्णालयात झालेल्या कोरोनाबाधित मृतांची संख्या ही जास्त आहे. या सर्व मृत नागरिकांवर बीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठानजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. तेही जुन्या पद्धतीने लाकडाची चिता रचून. या स्मशानभूमीत दरदिवशी सात ते आठ जणांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचे हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे.
अत्याधुनिक विद्युतदाहिनीमुळे काही मिनिटांतच अंत्यविधी पार पाडला जाऊ शकतो. ज्या आंत्यसंस्कारासाठी सहा ते सात तासाची प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी अडचण आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा नगरपालिका प्रशासनाने त्वरित विद्युतदाहिनी बसवावी, अशी मागणी यावेळी अशोक हिंगे यांनी केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बबनराव वडमारे,डॉ.नितीन सोनवणे, संतोष जोगदंड, ज्ञानेश्वर कवठेकर, खंडू जाधव, अजय सरवदे, शेख युनूस, संदीप जाधव, पुष्पा तुरुकमाने, लखन जोगदंड, आनंद कुशहर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.