हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:10+5:302021-06-06T04:25:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : मोसमी पावसाला सुरुवात होताच हुमणी आणि भुंगेरे प्रजनन होत असते. ते पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : मोसमी पावसाला सुरुवात होताच हुमणी आणि भुंगेरे प्रजनन होत असते. ते पुढे पिकासाठी घातक ठरत असतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रजननच होऊ नये, यासाठी प्रकाश सापळे लावणे गरजेचे आहे. तरी शेतकऱ्यांनी झाडाखाली हे सापळे लावण्याचे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पावसाला सुरुवात होताच हुमणी आणि भुंगेरे प्रजननासाठी बाहेर पडत असतात. एक मादी जवळपास एकावेळी ५० ते ६० अंडी घालते. त्यातून हुमणीच्या अळ्या तयार होतात. याच अळ्या कोवळ्या पिकाचा नाश करीत असतात. हे टाळण्यासाठी प्रजननावरच नियंत्रण मिळवणे हा सोपा उपाय आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी लिंब, बाभळीच्या झाडाखाली अल्प खर्चात प्रकाश सापळा, एरंड आंबवण सापळा लावून भुंगेरे मारून टाकावेत. एका प्रकाश सापळ्यात किमान शंभर भुंगेरे अडकून पडून मरून जातात; तर एका सापळ्यामुळे जवळपास ५००० हुमणी अळ्या नियंत्रणात आणता येतात.
किमान एका गावात दहा शेतकऱ्यांनी दहा-दहा सापळे लावले, तर ५० हजार हुमणी अळ्या आपण नष्ट करू शकतो. हे भुंगेरे २० ते २५ जूनपर्यंतच दिसतील. पुन्हा त्यांची अंडी अवस्था व अळी अवस्था नियंत्रित करणे अत्यंत खर्चिक व अवघड होते. परिणामी ऊस, सोयाबीन या पिकांवर मोठा प्रादुर्भाव होतो. हा सर्व संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गाफील न राहता सापळे लावून हुमणी नियंत्रण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी कृषी सहायक मार्गदर्शन करतील, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी केले आहे.
....
...असा लावावा सापळा
हुमणी अळीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी प्रकाश सापळा लावणे गरजेचे आहे. कडुलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली सापळा लावावा. तेथे एक बल्ब लावून त्याखाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून पाणी सोडावे. त्यात राॅकेल किंवा डिझेल मिसळावे. यात भुंगेरे पडून मरून जातात.
===Photopath===
050621\vijaykumar gadekar_img-20210604-wa0036_14.jpg