अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:40+5:302021-09-06T04:37:40+5:30
.... पोळा सणासाठी शेतकऱ्यांत उत्साह शिरूर कासार : तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने जवळपास धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यामुळे पाण्याची ...
....
पोळा सणासाठी शेतकऱ्यांत उत्साह
शिरूर कासार : तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने जवळपास धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. यामुळे पाण्याची टंचाई दूर झाली आहे. यामुळे पोळा सणासाठी उत्साह दिसून येत आहे. पोळ्यानिमित्त बाजारपेठेतही गर्दी दिसून आली.
...
बैलांच्या मिरवणुकीचा रस्ता कोरोनाने अडवला
शिरूर कासार : शेतकऱ्यांना बैलांच्या ऋणातून काहीसी उतराई होण्याचा सण म्हणजे पोळा. यादिवशी बैलाला कामाबाबत सुटी दिली जाते. त्याला धुऊन काढणे, बैलांची रंगरंगोटी करून चांगले सजवून त्यांची वेशीतून मिरवणूक काढून सन्मानाने घरी आणले जाते. त्यांना पुरणपोळीचा घास भरून त्यांचे औक्षण करून दर्शन घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाने बैलांच्या मिरवणुकीचा मार्ग अडवला. प्रशासनाने बैल मिरवणुकीस परवानगी दिली नाही. यामुळे यंदाही घरीच पोळा साजरा होणार आहे.
....
घराला गळती, भिंतीची पडझड
शिरूर कासार : तालुक्यात रात्री सर्वत्र धुवाधार पाऊस बरसल्याने अनेक घरांना गळती लागली होती. तर डबर मातीच्या भिंतीची पडझड मोठ्या प्रमाणावर झाली जीवितहानी नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असा प्राथमिक अंदाज तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी सांगितला. याबाबत सविस्तर अहवाल संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
...
सरपंचांची शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदणीसाठी मदत
शिरूर कासार : शनिवारी रात्री तिंतरवणी मंडलाअंतर्गत घोगस पारगाव येथे झालेल्या अति पावसामुळे शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणीत झालेल्या नुकसानीचे फोटो टाकून सरपंच देवा गर्कळ यांनी शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामपंचायत सदस्यदेखील उपस्थित होते. सरपंच देवा गर्कळ यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले.