खासगी डॉक्टरला शिवीगाळ, सरकारी डॉक्टरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:21 AM2021-02-05T08:21:06+5:302021-02-05T08:21:06+5:30
बीड : शहरातील एका खासगी रुग्णालयात टिसू पेपर का देत नाहीस, असे म्हणत खासगी डॉक्टरला शिवीगाळ करत जिवे मारण्याची ...
बीड : शहरातील एका खासगी रुग्णालयात टिसू पेपर का देत नाहीस, असे म्हणत खासगी डॉक्टरला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय डॉक्टरसह अन्य एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सोमवारी पहाटे १.१२ मिनिटांनी ही घटना घडली.
शहरातील शाहुनगर भागात डॉ. मनोज लांडगे यांचे यमुनाई डायग्नोस्टिक सेंटर आहे. रविवारी मध्यरात्री गेवराई येथील डॉ.बालाजी शेंडगे यांना कोरोना लस घेतल्यानंतर उजव्या हातात वेदना होत होत्या. त्यामुळे तालुका नोडल ऑफिसर डाॅ. संजय कदम यांनी डॉ. लांडगे यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन डॉ. संतोष धूत व डॉ. शेंडगे हे दोघे सेंटरमध्ये आले. कलर डॉप्लर करून झाल्यावर टिसू पेपरवरून त्यांच्यात बाचाबाची झाली. यात या दोघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे डॉ. लांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डाॅ. धूत व डॉ. शेंडगेविरोधात शिवाजीनगर ठाण्यात कलम ५०४, ५०६, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
काय म्हणतात दोन्ही डॉक्टर
कोट
डॉ. कदम यांचा फोन आल्याने मी आलो. रुग्णाची तपासणी केल्यानंतर टिसू पेपरवरून त्यांनी वाद घातला. मला शिवीगाळ करण्यासह धमक्या दिल्या. उपचार करूनही असे करणे चूक असल्याने मी फिर्याद दिली.
डॉ. मनोज लांडगे
कोट
डॉ. लांडगे व डॉ. शेंडगे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू होती. मी सोडवासोडव करीत होतो. शिवीगाळ अथवा धमकी दिलेली नाही.
डॉ. संतोष धूत