१५ डिसेंबरपर्यंत मिळणार विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:58 PM2019-11-29T23:58:01+5:302019-11-29T23:58:46+5:30

गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्याचा लाभ देखील देण्यात आला आहे. परंतु सोयाबीन पिकासाठी ओव्हर इन्शुरन्सचे कारण दाखवत ९० हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभापासून वंचित ठेवले होते.

Insurance benefit till December 3 | १५ डिसेंबरपर्यंत मिळणार विम्याचा लाभ

१५ डिसेंबरपर्यंत मिळणार विम्याचा लाभ

Next
ठळक मुद्दे२०१८ खरीप हंगाम विमा प्रकरण : ओव्हर इन्शुरन्समुळे ९० हजार शेतकरी वंचित

बीड : गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्याचा लाभ देखील देण्यात आला आहे. परंतु सोयाबीन पिकासाठी ओव्हर इन्शुरन्सचे कारण दाखवत ९० हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभापासून वंचित ठेवले होते. या संदर्भात जिल्हाधिका-यांनी शुक्रवारी बैठक घेतली. यामध्ये १५ डिसेंबरपर्यंत शेतक-यांना लाभ देण्याचे विमा कंपनीने सांगितले.
दि ओरिएन्टल इन्शुरन्सकडे २०१८ साली खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यात आला होता. या दरम्यान सोयाबीन पिकासाठी काही शेतकºयांनी क्षेत्रफळापेक्षा जास्तीचे क्षेत्र दाखवल्याचे समोर आले होते. मात्र, हे कारण दाखवत कंपनीने ९० हजार शेतकºयांचा विम्याचा लाभ रोखून धरला होता.
या प्रकरणी शेतकरी पुत्र संघटनेचे डॉ. उध्दव घोडके यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन आंदोलन देखील केले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी विमा कंपनी व्यवस्थापकीय संचालक विनिता जोशी व शेतकरी यांची शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची देखील उपस्थिती होती. यावेळी रखडलेल्या विम्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
‘रक्कम अदा करा’
जिल्हाधिकारी यांनी जे शेतकरी विम्याच्या लाभ्यासाठी पात्र असतील त्यांना १५ डिसेंबरपर्यंत रक्कम अदा करण्याचे आदेश विमा कंपनीस दिले. तसेच ज्या शेतकºयांनी क्षेत्रफळ कमी असताना अधिकच्या क्षेत्राचा विमा भरला आहे अशांवर कारवाई केली जाणार असा सवाल विमा कंपनीच्या वतीने बैठकीत उपस्थित केला. मात्र, या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी देखील विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले. कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे शेतक-यांना पीकविम्याचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Insurance benefit till December 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.