भूईमुगाच्या पिकात तिळाचे आंतरपीक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:33 AM2021-04-18T04:33:35+5:302021-04-18T04:33:35+5:30

धारुर तालुक्यातील आंबेवडगाव हा डोंगराळ भाग आहे. या भागात पाणी असलेल्या ठिकाणी उन्हाळी भूईमुगाचं पीक घेण्यात येत आहे. ...

Intercropping of sesame in groundnut crop is in full swing | भूईमुगाच्या पिकात तिळाचे आंतरपीक जोमात

भूईमुगाच्या पिकात तिळाचे आंतरपीक जोमात

googlenewsNext

धारुर तालुक्यातील आंबेवडगाव हा डोंगराळ भाग आहे. या भागात पाणी असलेल्या ठिकाणी उन्हाळी भूईमुगाचं पीक घेण्यात येत आहे. या पिकात तीळ हे आंतरपीक म्हणून घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. हे आंतरपीक सध्या जोमात असल्याचे पाहायला मिळाले. सध्या आंतरपीक असलेल्या तिळाच्या झाडांना चांगलीच बोंडे लगडली आहेत. हे पीक तुरळक प्रमाणात घेतले जात असून, त्यास मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. बाजारामध्ये भावही चांगल्याप्रकारे मिळतो. तिळाला प्रतिक्विंटल १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. मकर संक्रांतीला तिळाला मोठ्याप्रमाणात मागणी असते. पावसाळ्यात येणारे हे पीक असून, सध्या उन्हाळ्यातही याची लागवड शेतकरी करीत आहेत.

फोटो ओळ : धारुर तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात भूईमुगाच्या शेतात शेतकऱ्यांनी घेतलेले तिळाचे आंतरपीक.

===Photopath===

170421\anil mhajan_img-20210417-wa0097_14.jpg

Web Title: Intercropping of sesame in groundnut crop is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.